२४ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१९२५: संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८३७)

१९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२)

१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)

२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)

२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.

२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.