२४ फेब्रुवारी – जन्म

१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)
१९२४: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)
१९३८: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.
१९३९: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २०१२)
१९४२: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.
१९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)
१९५५: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)