२४ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.

१८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)

१८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)

१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.

१९७५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९५)

१९८६  भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)

१९९८: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९१६)

२०११: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.