२४ जुलै रोजी झालेले जन्म.

१७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.

१८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.

१९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.

१९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९६०)

१९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म.

१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.

१९४५: विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म.

१९४७: पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म.

१९६९: अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.