२४ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१६३२: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

१७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)

१८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)

१९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.

१९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २०१२)

१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)

१९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.

१९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.

१९७२: अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.