२५ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

१८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

१९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.

१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

१९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

२००१: सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.