२५ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

१९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.

१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)

१९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म.

१९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.

१९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म.

१९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.

१९६५: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.

१९६९: भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.

१९९४: भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.