२५ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४)

१८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १७३६)

१८२२: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)

१८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)

१९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२)

२०००: डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९०१)

२००१: संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे निधन.

२००१: टायरेल रेसिंग चे संस्थापक केन टाइरेल यांचे निधन. (जन्म: ३ मे १९२४)

२००८: उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९३१)

२०१२: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)

२०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.