२५ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
१९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.
१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
१९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न प्रदान.