२५ जून रोजी झालेल्या घटना.

१९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

१९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.

१९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.

१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

१९७५: मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

१९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

२०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.