२५ मे रोजी झालेले मृत्यू.

१९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)

१९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)

१९९९: संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.

२००५: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचे निधन. (जन्म: ६ जून १९२९)

२०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन. ( जन्म: ५ ऑगस्ट १९५०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.