२५ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.

१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)

१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)

१८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)

१८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९६८)

१८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.

१९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

१९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)

१९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.

१९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.

१९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.

१९५२: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.

१९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.

१९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.