२६ एप्रिल रोजी झालेल्या घटना.

१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

१९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.

१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

१९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.

१९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.

१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.