२६ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८०२: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८८५)

१८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९०२)

१८६६: अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९३०)

१८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.

१९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २००७)

१९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण  यांचा जन्म.(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९०)

१९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.