२६ जुलै रोजी झालेल्या घटना.

१५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

१७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

१८४७: लायबेरिया स्वतंत्र.

१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.

१९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.

१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

१९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९६५: मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.

१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

१९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

१९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

२००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

२००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.