२६ जून रोजी झालेल्या घटना.

१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.

१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

१९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

१९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.

१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.

१९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.

१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.

२०००: पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.