२६ जून रोजी झालेले जन्म.

१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.

१७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)

१८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)

१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)

१८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)

१८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९६७)

१८९२: अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)

१९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)

१९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.