२६ मार्च – जन्म

२६ मार्च रोजी झालेले जन्म.

१८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)

१८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)

१८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)

१८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)

१८९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

१९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)

१९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

१९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.