२६ मे रोजी झालेले जन्म.

१६६७: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५४)

१८८५: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)

१९०२: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)

१९०६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेन्जामिन पिअरी पाल यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)

१९३०: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)

१९३७: भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०१५)

१९३८: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी. बिक्रम सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१३)

१९४५: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)

१९६१: भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.

१९६६: दक्षिण अफ्रिकेची धावपटू झोला बड यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.