२६ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१२७०: संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०)

१८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)

१८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)

१९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३)

१९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

१९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८०)

१९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

१९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

१९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)

१९७४: अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.