२७ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१८५४: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९३८)

१८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९३२)

१८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०)

१९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७३)

१९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)

१९१०: इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४)

१९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१)

१९१९: संतसाहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल २०१३)

१९२५: रहस्यकथाकार नारायण धारप यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)

१९२५: भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५)

१९३१: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००७)

१९७२: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.

१९८०: भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.