२७ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.

१९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.

१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.

१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.

१९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.

१९४९: इंडोनेशिया  देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.

१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.

२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.

२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.