२७ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१९४७: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८६८)

१९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०२)

१९८६: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)

२००७: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९३२)

२००८: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचे निधन. (जन्म: ८ जून १९२१)

२००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.