२७ जून रोजी झालेले जन्म.

१४६२: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

१५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)

१८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.

१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)

१८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)

१८९९: पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)

१९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)

१९१९: भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री अमला शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै २०२०)

१९३९: संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)

१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा  जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.