२७ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)

१९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)

१९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८९०)

१९६८: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३४)

१९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.

१९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.

२०००: हिंदी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.