२७ नोव्हेंबर – मृत्यू

१७५४: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचे निधन. (जन्म: २६ मे १६६७)

१९५२: तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १८७९)

१९६७: गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष लेओन मब्बा यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९०२)

१९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

१९७६: प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०५)

१९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०७ – महाड, रायगड)

१९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

२०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०९)

२००२: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९१५)

२००७: गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२७)

२००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: २५ जून १९३१)