२७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)

१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.

१९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)

१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

१९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)

१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)

१९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.

१९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९३५)

२००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)

२००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)

२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)

२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)

२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.