२८ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७५८: अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्‍रो यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८३१)

१८५४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९४४)

१९०८: ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.

१९१६: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी  १९९३)

१९२९:  सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझाईनर भानु अथैया यांचा जन्म. (निधन: १५ ऑक्टोबर २०२०)

१९३१: लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.

१९३७: इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००६)

१९४२: इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.

१९६८: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.