२८ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)

१९४५: इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: २९ जुलै १८८३)

१९७८: अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९०९)

१९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)

१९९८: जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन. (जन्म: २० जून १९३९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.