२८ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८)

१९३१: चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन.

१९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन.

१९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.

१९७७: हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: २० मे १९००)

१९८१: हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.

२०००: प्रसिद्ध तत्वचिंतक, विचारवंत, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन.

२०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)

२००३: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.

२००६: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.