२८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक)

१९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८९९)

१९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८४)

१९६६: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८९८)

१९६७: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८९८)

१९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या. (जन्म: ३० जानेवारी १९२७)

१९९५: कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१४)

१९९८: अभिनेता राजा गोसावी यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२५)

१९९९: औध संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.