२८ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१५४७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचे निधन. (जन्म: २८ जून १४९१)

१६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)

१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)

१९८४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८९७)

१९९६: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

१९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म: २७ जुलै १९११)

२००७: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.