२८ जून रोजी झालेले मृत्यू.

१८३६: अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१)

१९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३)

१९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११)

१९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचे निधन.

२०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९२७)

२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

२००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ६ मे १९५५)

२०२०: बडुकू कादंबरीसाठी कन्नडमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेत्या प्रख्यात भारतीय स्त्रीवादी लेखक गीता नागाभूषण यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९४२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.