२८ मे रोजी झालेले जन्म.

१६६०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७)

१८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)

१९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९९४)

१९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)

१९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९६४)

१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५)

१९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९९६)

१९४६: भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.