२८ सप्टेंबर – जन्म

१८०३: फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

१८३६: बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०)

१८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

१८९८: स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.

१९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९०९: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

१९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

१९४६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.

१९४७: बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म.

१९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

१९८२: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

१९८२: चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म.