२८ सप्टेंबर – मृत्यू

१८९५: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८२२)

१९३५: कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८६०)

१९५३: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)

१९५६: बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८८१)

१९७०: इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन.

१९८१: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निधन.

१९८९: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)

१९९१: अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निधन.

१९९२: पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन.

१९९४: भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९१७)

२०००: सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.

२००४: इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०५)

२०१२: चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.

२०१२: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)