२९ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७२७: फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १८१०)

१८४८: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९०६)

१८६७: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९३५)

१८९१: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९६४)

१९०१: दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म. (मृत्यू: ७ जानेवारी १९८९)

१९३६: भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.

१९६६: इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.

१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.