२९ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८)

१४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.

१८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.

१८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.

१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.

१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.

१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.

१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.

१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.

२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.