२९ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १८६०)

१८०८: अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८७५)

१८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.

१८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.

१९००: मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)

१९०४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)

१९१७: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)

१९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)

१९४२: सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०१२)

१९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.

१९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.