२९ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७)

१७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९)

१८४३: अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)

१८५३: ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म.

१८६०: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९०४)

१८६६: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)

१९२२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९२६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)

१९५१: वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.

१९७०: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.