२९ जानेवारी – मृत्यू

१५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: ९ मे १५४०)
१८२०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन. (जन्म: ४ जून १७३८)
१९३४: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)
१९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.
१९६३: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७४)
१९९३: गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
१९९५: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.
२०००: बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन.
२०००: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.
२००१: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.