२९ जुलै रोजी झालेले जन्म.

१८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)

१८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.

१९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)

१९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.

१९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.

१९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.

१९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.

१९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.

१९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.