२९ जून रोजी झालेले मृत्यू.

१८७३: बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८२४)

१८९५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक थॉमस हक्सले यांचे निधन. (जन्म: ४ मे १८२५)

१९६६: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०७)

१९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

१९९२: अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे निधन.

१९९२: सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचे निधन.

१९९३: चिमणराव-गुंड्याभाऊ  मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचे निधन.

२०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

२००३: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७)

२०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.