२९ मार्च रोजी झालेले जन्म.

१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)

१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)

१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)

१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

१९३९: भारतीय चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ सुरमा भोपाली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २०२०)

१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

१९५५: भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार रांजॉन घोषाल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २०२०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.