२९ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)

१९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८६३)

१९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९५)

१९८१: अभिनेते दादा साळवी यांचे निधन.

१९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.