३ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८३०)

१८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९२८)

१८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६७)

१९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८)

१९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)

१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून २००८)

१९३०: जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.

१९३४: इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.

१९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.

१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.

१९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)

१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.