३ जून रोजी झालेले मृत्यू.

१६५७: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १५७८)

१९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)

१९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८८१)

१९८९: इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९०२)

१९९०: इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२७)

१९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)

१९७७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.

२०१०: मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९)

२०१३: जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

२०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९४९)

२०१६: अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९४२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.