३ मार्च रोजी झालेले जन्म.

१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)

१८४५: जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)

१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)

१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.

१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.

१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)

१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.

१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)

१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)

१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.

१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.

१९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.