३ मार्च – मृत्यू

३ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)

१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)

१९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.

१९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)

१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.

१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

१९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)

१९९५: तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.

२०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.