३ मे रोजी झालेले मृत्यू.

१९१२: उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचे निधन.

१९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)

१९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९०१)

१९७७: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

१९७८: लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे येथे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८९५ – घोसपुरी, अहमदनगर)

१९८१: हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन. (जन्म: १ जून १९२९)

१९९६: व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.

२०००: पद्म भूषण पुरस्कृत जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०६)

२००६: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)

२००९: जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९३१)

२०११: गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन. (जन्म: १० मे १९३२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.